सातारा जिल्ह्यातील एक गाव रहिमतपूर गावातलं एक कुटुंब होते, ते पुण्याच्या शिवाजीनगर मधल्या नरवीर तानाजी वाडीमध्ये राहात होते. वडील फिलिप्स कंपनीमध्ये हेल्पर होते आणि आई घरकाम करणारी होती. दोन भाऊ आणि एक बहिण असं त्याचे हे पाच जणांचं कुटुंब होते. तानाजी वाडीतल्या एका छोट्याशा घरात राहत होते.
सगळ्यांणा लागणारे गरुजू अपेक्षा म्हणजे मोठ्या मुलाकडून अपेक्षा राहते घराची परिस्थिती हलाखीची होती पण तरी त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत होते. त्याच्याकडे पुस्तकं घ्यायला पैसे नव्हते, फी भरायला पैसे नव्हते. कोणत्याही अडचाणी पार पाडत कसाबसा दहावी पर्यंत पोहचला. दहावी नंतर तो पुस्तकी शिक्षण सोडून दिले आणि खरे शिक्षण का असते त्या शिक्षणाला सुरवात केली. आयुष्यामध्ये व्यावहारिक ज्ञान घेणे हे शिकवत असलेलं शिक्षण घेत होते.
त्याला तसं लहान पणा पासूनच घरातल्या बिघडलेल्या इलेकटिक वस्तू दुरुस्त करायची खुप आवड होती. त्यांनी वडिलांचं बघून बघून सहावी मध्ये असतानाच त्याने रेडियो दुरुस्त करायला सुरवात केली होती. त्याने इलेक्ट्रीक वस्तू दुरुस्त करण्याचा एक महिन्याचा कोर्ससुद्धा केला होता. आपण काही तरी करू असा आत्मविश्वास होता. दहावी च्या निकालाची वाट न बघता त्याने नोकरी शोधायला सुरवात केली.
तो एक दिवस पेपर वाचत असताना त्यात एक जाहिरात बघतली. एका कंपनीमध्ये कॅलक्युलेटर दुरुस्त करणाऱ्याचीएक नौकरीची आवश्यकता होती. त्याने आयुष्यात एकदापण कधी कॅलक्युलेटर बघितलासुद्धा नव्हता. तरी पण त्याने त्या नौकरीसाठी अर्ज केला. अनपेक्षित पणे मुलाखती साठी आलेल्या पंचवीस अर्जामधून त्याची निवड झाली. सहजस केलाल अर्ज अंगभूत खटाटोपीपणा कामी आला. त्या कंपनीत कॅलक्युलेटर दुरुस्तीचं काम तर शिकले, आणि शिवाय बँकांमधलं लेजर पोस्टिंग मशीन, फॅसिट मशिन अशा वेगवेगळ्या मशिन्स दुरुस्त करू शिकता येऊ लागल्या.
त्यानंत काही काळन नोकरी सोडली आणि त्याने पुण्याच्या मंगळवार पेठेत स्वतःचं दुरूस्तीचं दुकान सुरु केलं. त्या सोबत एक हरकाम्या एक मुलगा सुद्धा ठेवला. त्यामध्ये त्यांची दिवसभर वेग-वेगळ्या मशिन्स सोबत झटापट चालायची. त्यामध्ये त्याला पैसे बऱ्यापैकी मिळू लागले. एक दिवस बँकेत अनोळखी एक नवीनच कोणतेतरी मशीन दिसलं. त्याने त्या मशीन बद्दलचौकशी केली, कोणी तरी सांगितलं.. हा कॉम्पुटर आहे....
त्याने बघतल्यावर त्याला विचारात पडू लागला. त्याने अस विचार केला की येणारं युग जर कॉम्प्युटरचं आसेल तर आपल्याला शिकून घेतलं पाहिजे. पण कॉम्पुटर शिकायचं कुठे हा सुद्धा प्रश्न त्याला पडला.
हा काळ नव्वदच्या दशकातला आहे. कॉम्प्यूटरने नुकताच भारतात उगम प्रवेश केला होता. त्याच्या येण्याने आपल्या नोकऱ्या जातील म्हणून काही संघटना एकत्र लढा देत होत्या. कॉम्प्यूटर त्या काळात खुप महाग होते आणि फक्त मोठ्या कंपन्यांमधेच दिसायचे. त्याला तर कोणी कॉम्प्यूटरच्या जवळ देखील येऊ देत नव्हतं.
पण एकदा संधी मिळाली...
पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोडवर टाईम्स ऑफ इंडियाचं ऑफिस आहे. त्यांचे तीन प्रिंटर बंद पडले होते. दुरुस्तीला आलेल्यांनी सांगितलं ते फेकुनच द्यायच्या लायकीचे उरले आहेत. ऑफिसवाल्यांनी तशीच तयारी केली होती. पण योगायोगाने हा तिथे पोहोचला आणि पैजेवर ते मशीन दीड तासात दुरुस्त करून दाखवले.
टाईम्स ऑफ इंडियानं मग फक्त प्रिंटरच नाही तर त्याच्या हातात आपले कॉम्प्यूटरसुद्धा देऊन टाकले. दोन वर्षाचा दुरुस्तीचा करार केला. त्याच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉइंट ठरला. टाईम्स ऑफ इंडियाचं बघून बाकीच्या कंपन्या, बँकादेखील त्यांना काम देऊ लागल्या. पुण्यात कॉम्प्यूटर हार्डवेअर दुरुस्ती मध्ये त्याचं नाव सर्वतोमुखी झालं.
स्वतःचं शिक्षण अर्धवट सुटलं पण त्याने आपल्या भावाबहिणीच्या शिक्षणाच्या बाबतीत कोणतीच तडजोड केली नाही. धाकटा भाऊ संजयसुद्धा हुशार होता. त्याला त्याने मॉडर्न कॉलेज मध्ये कॉम्प्यूटर इंजिनियरिंगला प्रवेश घ्यायला लावला. तो देखील दिवसभर कॉलेज करून संध्याकाळी भावाच्या कामात मदत करत होता.
त्याकाळी व्हायरस हे प्रकरण नव्यानेचं उदयास आलं होतं. साथीच्या रोगाने जशी माणसे आजारी पडतात त्याप्रमाणेच कॉम्प्यूटरदेखील एखाद्या विशिष्ट प्रोग्रॅमचा प्रादुर्भाव झाला तर आजारी पडतात. मग ते आजारी पडू नयेत यासाठी असतं रोग प्रतिबंधकारक औषध… अँटी व्हायरस.
या व्हायरसच्या साथीची लागण झालेले बरेच कॉम्प्यूटर पुण्यात दुरुस्तीला त्यांच्याच दुकानात यायचे. लोक सांगायचे की तुम्हीच याला दुरुस्त करा. पण हा विषय होता सॉफ्टवेअरचा. हार्डवेअर वाले त्यात काय करणार? काहीतरी करून तो ते कॉम्प्यूटर सुरु करून द्यायचा. त्याच्या धाकट्या भावाने, संजयने, अशा लागण होणाऱ्या व्हायरसवर उपाय म्हणून एक टूल बनवले होते, जे त्यांच्या एका कस्टमरला खूप आवडले.
आतापर्यंत खुपसा धंदेवाईक झालेल्या याने हेरलं की हा अँटी व्हायरसचा धंदा बराच पैसा कमावणार. त्याने भावाला एक स्पेशल कॉम्प्यूटर घेऊन दिला. तानाजीवाडी मधल्या त्या वस्तीतल्या एका खोलीच्या घरात संजय अँटी व्हायरस बनवायच्या मागे लागला. दीड वर्षे लागली पण मराठी माणसाचं स्वतःचं अँटी व्हायरस तयार झालं. त्याला नाव देण्यात आलं..क्वीक हील अँटी व्हायरस !
संजयने स्वतःच या अँटी व्हायरसचा लोगो डिझाईन केला, पॅकेजिंग तयार केलं. मोठा भाऊ कंपन्यांच्या दारोदार फिरून आपलं प्रॉडक्ट खपवू लागला. कॉम्प्यूटरमधल्या डाटाची नासाडी करणाऱ्या व्हायरसवर उतारा असलेला अँटी व्हायरस असणं किती गरजेचे आहे हे पटवून सांगेपर्यंत त्यांना नाकीनऊ यायचे, पण त्यांनी जिद्द सोडली नाही.
त्याकाळात पुण्यात बऱ्याच आयटी कंपन्या सुरु होत होत्या. आयटीपार्क उभं राहत होत. अशा सगळ्या नव्या जुन्या कंपन्यांना परदेशी अँटी व्हायरस पेक्षा चांगलं आणि स्वस्त असलेलं हे देशी अँटी व्हायरस पसंतीस पडलं. क्विक हिल अँटी व्हायरस बरोबर अनेक कंपन्यांनी वर्षाचे करार केले.
अजून मोबाईल फोन देखिल आले नव्हते अशा काळात आफ्टर सर्विसला देखील भरपूर महत्व होतं. त्याने मेहनतीने आपले ग्राहक सांभाळले. पुण्याबरोबर नाशिक, मुंबई येथे देखील आपली टीम उभी केली. वेगवेगळ्या शहरात जाण्याचाही त्यांना फायदा झाला. क्वालिटीच्या जीवावर स्पर्धेच्या काळातही क्विकहिल मोठी झाली.
मंगळवार पेठेत असणाऱ्या ऑफिसमधून कधी एक लाख स्क्वेअर फुटच्या ऑफिसमध्ये रुपांतर झाले, कळले देखील नाही.
आज या कंपनीत तेराशेच्या वर कर्मचारी काम करतात. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांची ऑफिसेस आहेत. आज ऐंशीहून अधिक देशातल्या कॉम्प्यूटरमध्ये हे देशी अँटी व्हायरस मानाची जागा घेऊन बसलंय.
आणि हे सगळ साम्राज्य उभं केलंय एका दहावीनंतर शाळा सोडलेल्या मराठी मुलानं!
त्याचं नाव जाणून घेण्याची उत्सुकता आहे का?
त्यानी सुरुवातीला चारशे रुपयांच्या नोकरीपासून सुरवात कली आणि आता सातशे कोटींची जागतिक पातळीवरील अँटी व्हायरस (Antivirus) कंपनी स्थापन करणाऱ्या या युवकाचं नाव आहे, कैलास साहेबराव काटकर..
कोणतीही पदवी चे शिक्षण न घेता केवळ आपल्या कष्टांच्या जोरावर जागतिक दर्जाची कंपनी उभारणाऱ्या मराठी युवकाची जीवनाची गोष्ट नक्कीच प्रेरणादायी आहे.
No comments:
Post a Comment